•द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी बोलणे अवघड आहे का?

Blog Post

•द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी बोलणे अवघड आहे का?

••हो अवघड आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर द्वितीय भाषा म्हणून इंग्रजी अवगत करणे कठीण आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो. या सर्वांची मुळे शिक्षणपद्धतीत रुजलेली आहेत. एक साधी आणि अनुभवतील समस्या आपण समजून घेऊ.

एखादा माणूस एक इंग्रजी वाक्य बोलला आणि ते आपण ऐकले तर आपल्या मेंदूत पुढील प्रक्रिया घडतात.

1. एखादा माणूस इंग्रजी वाक्य बोलतो.

2. ते इंग्रजी वाक्य तुमच्या कानात जाते

3. कानातील इयरड्रम मधून मेंदूकडे पाठवले जाते.

4. मेंदुमद्धे मिळालेल्या इंग्रजी वाक्याचे, अगोदरच्या मिळवलेल्या इंग्रजी ज्ञानानुसार समजून घेण्याचे प्रयत्न सुरू होतात.

5. जे ही तोडके-मोडके समजून घेतले जाते त्याला आपला मेंदू मातृभाषेत भाषांतरित करण्याचा प्रयत्न करतो

6. मातृभाषेत समजल्यानंतर मेंदू मातृभाषेतून विचार सुरू करतो

7. मातृभाषेत प्रतिसाद तयार करतो.

8. मातृभाषेत जो प्रतिसाद तयार केला आहे त्याचे इंग्रजीत भाषांतर करतो.

9. आणि हे इंग्रजीचे भाषांतर बोलण्यासाठी ओठांना आज्ञा केली जाते.

10. आणि ही प्रक्रिया अविरत चालू असते.

वरील पद्धतीमध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत भाषा शिकणे अवघड आहे? नाही अशक्य आहे.

•पण आपण वरील प्रमाणेच विचार का करतो? आपल्या मेंदूत याच क्रिया का घडतात?

••कारण हा किडा (सॉरी व्हायरस) आपल्या शिक्षण पद्धतीने आपल्या मेंदूत टाकला आहे. (मी याविषयी नंतर सविस्तर लिहिलच)

•शिकणे आणि आत्मसात करणे यामधील फरक.

•आपण मराठी भाषिक आहोत, आणि मराठी आपली मातृभाषा आहे. आपण ती आईकडून आणि समाजाकडून शिकलो. पण तुम्हाला हिन्दी कोणी शिकवली?

हिन्दी चित्रपटांनी, आणि दूरदर्शनवरील कार्यक्रमांनी.

मराठी आणि हिन्दी या दोन्ही भाषा आपण आत्मसात केलेल्या आहेत. त्या आपण शिकलो नाहीत.

•आत्मसात करणे, स्वीकारणे, अनुकरण करणे = To adopt, to accept, to imitate

•शिकणे = to learn

•इंग्रजी ही पहिली भाषा आहे जी आपण शिकण्याचे मनावर घेतले आहे.

(एक गम्मत = जी भाषा आपण शिकतो ती आपण बोलतो आणि तिचे व्याकरणसुध्दा आपणास समजते. म्हणजे आपल्याला हिन्दी आणि मराठी व्याकरण येऊ शकत नाही जोपर्यंत आपण ते शिकत नाही.)

•ही शिक्षणपद्धती इंग्रजी बोलायला समजायला शिकवू शकते का?

•नक्कीच नाही. यासाठी आपणास भाषा आणि साहित्य यामधील फरक समजावून घ्यावा लागेल.

•इंग्रजी एक भाषा आहे आणि ‘विंग्ज ऑफ फायर आणि इतर लाखो पुस्तकं हे त्यामधील साहित्य आहे.

•आपल्याला इंग्रजी भाषाच जर येत असेल तर भाषा शिकण्यासाठी त्या भाषेतील लाखो पुस्तकांचा अभ्यास करण्याची गरजच नाही.

•जसे आपल्याला मराठी भाषा येते म्हणून आपण मराठी न्यूजपेपर वाचू शकतो, यश तुमच्या हातात’ या नावाचे पुस्तक वाचू शकतो. आणि इतरही लाखो पुस्तके आपण वाचू आणि समजू शकतो. कारण आपणास मराठी भाषाच येते.

•पण आपणास इंग्रजी भाषाच येत नाही आणि अभ्यासासाठी इंग्रजी भाषेतील पुस्तके (म्हणजे साहित्य) दिले जाते.

•इंग्रजी भाषाच जर शिकवली तर साहित्य आपोआपच समजणार आहे. इंग्रजी न्यूजपेपर आपोआपच समजेल. पण दुर्दैवाने इंग्रजीची इयत्ता पहिलीपासूनची पुस्तके पाहता ती मुलांना भाषेची कौशल्ये पुर्णपणे शिकवू शकत नाही हे समजते.

•भाषा येणे म्हणजे नेमके काय येणे :

सध्या आणि सरळ भाषेत सांगायचे तर भाषा येणे म्हणजे भाषेची कौशल्ये येणे.

भाषेची कौशल्ये कोणती आहेत.

1. एकणे (इनपुट)

2. बोलणे (आउटपुट)

3. वाचणे (इनपुट)

4. लिहिणे (आउटपुट)

5. विचार करणे (भाषेचे हे पाचवे कौशल्य मी माझ्या अनुभवाने लिहिले आहे)

•भाषा शिकण्याचे मार्ग कोणते आहेत.

•फक्त दोनच मार्ग आहेत.

अनुकरण करणे किंवा शिकणे. यापेक्षा वेगळा मार्ग शक्य नाही.

•आपण अनुकरण करू शकत नाहीत कारण आपल्या सभोवती इंग्रजी भाषा बोलणारी माणसचं नाहीत. नाहीतच. उरतो तो पर्याय एकच तो म्हणजे शिकणे.

•युट्यूब पाहून इंग्रजी येऊ शकते का? तर हो. पाठांतर केलेली वाक्य येऊ शकतात. कामचलाऊपणा, वेळ मारून जाणे इथपर्यंत येऊ शकते, तुम्ही अस्खलित बोलू शकत नाहीत. (नाहीतर आपण आत्तापर्यंत शिकलो असतो)

•इंग्रजी न्यूनपेपर दररोज वाचल्याने इंग्रजी बोलता येते का? तर नाही येत. नवशिकया माणसाने इंग्रजी पेपरच्या मागे लागू नये. आत्मविश्वाश गमावून बसाल. त्यापेक्षा लहान मुलांची बोधकथेची पुस्तके वाचून समजून घ्यावीत.

•इंग्रजी बोलणारा प्रत्येक माणूस इंग्रजी शिकवू शकतो का? नाही शिकवू शकत. कारण तुम्ही कोणाला मराठी शिकवू शकता का? तर नाही शिकवू शकत कारण तुम्ही मराठी शिकलेले नाहीत, ती स्वीकारलेली आहे. आणि स्वीकारलेल्या भाषेचे व्याकरण आपणास शिकल्याशिवाय समजू शकत नाही.

•काय केले पाहिजे?

1. इंग्रजी बोलायला शिकायची असेल तर, इंग्रजी बोलली पाहिजे.

2. इंग्रजी भाषेत लिहिले पाहिजे

3. इंग्रजीची पुस्तके वाचली पाहिजेत

4. इंग्रजी ऐकली पाहिजे

5. इंग्रजी भाषेत विचार केला पाहिजे.

•पण हे कसे करायाचे? त्यासाठी इंग्रजी बोलायला शिकवणारा कोणत्याही जानकारची मदत घ्या किंवा चांगला क्लास जॉइन करा.

•आपण क्लास जॉइन न करता, स्वतः अभ्यास करून इंग्रजी शिकू शकतो का?

हो नक्की शिकू शकतो. फक्त वेळ जरा जास्त लागेल. तरीही तुम्ही केलेला अभ्यास बरोबर आहे की नाही यासाठी जानकाराची गरज नक्कीच पडेल.

•इंग्रजी बोलण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता?

इंग्रजी बोलणे हा एकमेव मार्ग आहे.

केसरीसर, महाराष्ट्र, भारत

Comments

Popular posts from this blog

100+ Grammar Tests for all competitive Exams

30 Key Points for Coaching Centers