इंग्रजी शिकतांना: पाठांतर आणि समजणे यातील फरक

इंग्रजी शिकतांना
पाठांतर आणि समजणे यातील फरक

जे समजत नाही ते आपणास पाठ करावे लागते, आणि जे समजते ते लक्षात ठेवण्याची गरजच नसते

पाठांतर केलेली कोणतीही गोष्ट फक्त पाठांतरा पुरतीच मर्यादित राहते; पण समजलेल्या गोष्टींची अप्लिकेशन तुम्ही तुमच्या मनाने विविध स्तरावर आणि तुमच्या पद्धतीने अचूक करू शकता.

मुलीला 'ती' म्हणायचे, हे तुम्ही पाठांतर केलेले नाही; ते तुम्हाला समजलेले आहे.

•तत्व म्हणजे काय?

ज्यांना शून्य ते नऊ पर्यंतचे आकडे माहिती नाहीत; त्यांची स्थानिक किंमतच माहिती नाही; त्यांना 12,740 म्हणजे काय कधीच समजू शकत नाही.

पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्ही तोंडी सांगू शकता:
पाच अधिक पाच
दहा अधिक दहा
चार अधिक तीन
सहा अधिक सहा
वीस अधिक वीस
पन्नास अधिक पन्नास

परंतु
1265389743
+
2468753146
_______________

परंतु वरील संख्यांची बेरीज तुम्ही सहज तोंडाने सांगू शकत नाही. पण या दोन्ही संख्या एकाखाली एक लिहिल्या बेरजेचे चिन्ह दिले, तुमच्याकडे एक पेन दिला, तर तुम्ही चुटकीसरशी बेरीज करू शकता. काय कारण? कारण हेच आहे की तुम्हाला बेरीज करण्याचं तत्त्वच समजलेले आहे. मग जगातल्या कोणत्याही संख्या असतील तरी तुम्ही बेरीज करू शकता, गुणाकार करू शकता, भागाकार करू शकता, वजाबाकी करू शकता, कारण तुम्हाला बेसिक तत्वच समजलेली आहेत, तर मग उदाहरणे कोणतीही, आणि कितीही अवघड असुद्यात तुम्ही ती सोडणार आहात.

सांगायचे इतकेच की, पन्नास अधिक पन्नास लक्षात ठेवण्यापेक्षा बेरजेचे तत्वच समजून घेतलं तर लक्षात ठेवण्याची गरजच नाही.

What is your name
म्हणजे तुझे नाव काय आहे,
Get well soon म्हणजे
लवकर बरे व्हा

असे पाठांतर करण्यापेक्षा भाषेचे तत्व जर समजले तर लक्षात ठेवण्याची गरज नाही. जे बोलायचे आहे ते ऑटोमॅटिक समजणार आहे. आयते पकडलेले मासे मिळवण्यापेक्षा मासे पकडण्याचे कौशल्य जर आपण  शिकलो तर कितीही मासे धरता येतील, आणि कितीही मोठे मासे धरता येतील, कारण मासे धरण्याचे कौशल्यच आपल्याला समजलेले आहे.

•सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर

समजा, तुम्हाला एक व्हिडीओ एडीट करावयाचा आहे.
तुम्ही तो व्हिडिओ पेनड्राइव्ह मध्ये घेतला.
घरी आलात, तुमचे कम्प्युटर चालू केले.
पेन ड्राइव्ह कॉम्प्युटरला जोडला.
पण तुमच्याकडे, तुमच्या कम्प्युटरमध्ये व्हिडिओ एडिट करण्याचे सॉफ्टवेअरच नाही
आणि एडिट करण्याचे कौशल्य तुमच्याकडे नाही.

तुम्ही वाचण्यासाठी इंग्रजीचे एखादे पुस्तक घेता, आणि वाचायला सुरुवात करता, 1-2-3 पाने वाचता.

आपण वाचतो, पण  वाचलेले आपण आकलन करू शकत नाही, कारण त्या प्रकारचे सॉफ्टवेअर, ते समजून घेण्याचे सॉफ्टवेअर आपल्या मेंदूमध्ये यापल्या शिक्षण पद्धतीने कधीच इन्स्टॉल केलेला नाही.

काय करावं लागेल?

तुम्ही भाषेचे अनुकरण करू शकत नसाल तर भाषा शिकावी लागेल. भाषा शिकणे म्हणजे भाषेची कौशल्ये शिकणे, आणि कौशल्य शिकण्यासाठी तत्त्वांची गरज भासते. जसे की बेरजेचे तत्व वजाबाकी चे तत्व भागाकार गुणाकाराचे तत्व.

एकदा ही तत्व समजून घेतलीत की आपल्या मेंदूमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल होते ज्याने पाठांतर न करता या तत्वांचा अभ्यास करून आपण इंग्रजी समजावून घेऊ शकतो. लिहिणे, बोलणे, ऐकणे, वाचणे, समजून घेणे, विचार करणे या सर्व कौशल्यांवर मास्टरी मिळवता येते.

•तत्व कशी शिकायची?
किंवा आपण स्वतः अभ्यास करून तत्त्वांची निर्मिती करू शकतो का?

हो करू शकतो, समजा तुम्हाला कामानिमित्त अमेरिकेत जायचे आहे, जाऊद्या मुंबईला जायचे आहे. तुमच्याकडे स्वतःचे वाहन नाही.

आशा वेळी तुमच्याकडे दोनच पर्याय आहेत:
1)तुम्ही नवीन वाहन विकत घ्या.
2)दहा-पंधरा समविचारी आणि मुंबईला जाणाऱ्या मित्रांसह गाडी भाडे तत्वावर घेऊन मुंबईला पोहचा, आपलं काम करून सुखरूप परत या

•तुम्हाला जर दुसरा पर्याय योग्य वाटत असेल तर इंग्रजी भाषा बोलायला शिकवणाऱ्या सेंटरला आपण भेट देऊन कोर्स पूर्ण करू शकता आणि भाषेची कौशल्य आणि तत्वे शिकून घेऊ शकता.

•आणि आपणास पहिला पर्याय निवडायचा असेल तर आपले स्वतःचे स्पोकन इंग्लिशचे सेंटर सुरू करू शकता आम्ही त्यासाठी मदत करू.

इंग्रजी भाषेची तत्वे शिकवणारा फुल-टाईम इंग्लिश चा कोर्स आम्ही लवकरच सुरू करत आहोत.

फुल-टाइम कोर्सच्या अधिक माहितीसाठी https://ENNglish.com  वर क्लिक करा.









प्रकाश बाळासाहेब केसरी

Offline @ Shrigonda.