इंग्रजी शिकतांना: पाठांतर आणि समजणे यातील फरक

इंग्रजी शिकतांना पाठांतर आणि समजणे यातील फरक जे समजत नाही ते आपणास पाठ करावे लागते, आणि जे समजते ते लक्षात ठेवण्याची गरजच नसते पाठांतर केलेली कोणतीही गोष्ट फक्त पाठांतरा पुरतीच मर्यादित राहते; पण समजलेल्या गोष्टींची अप्लिकेशन तुम्ही तुमच्या मनाने विविध स्तरावर आणि तुमच्या पद्धतीने अचूक करू शकता. मुलीला 'ती' म्हणायचे, हे तुम्ही पाठांतर केलेले नाही; ते तुम्हाला समजलेले आहे. •तत्व म्हणजे काय? ज्यांना शून्य ते नऊ पर्यंतचे आकडे माहिती नाहीत; त्यांची स्थानिक किंमतच माहिती नाही; त्यांना 12,740 म्हणजे काय कधीच समजू शकत नाही. पुढील प्रश्नांची उत्तरे तुम्ही तोंडी सांगू शकता: पाच अधिक पाच दहा अधिक दहा चार अधिक तीन सहा अधिक सहा वीस अधिक वीस पन्नास अधिक पन्नास परंतु 1265389743 + 2468753146 _______________ परंतु वरील संख्यांची बेरीज तुम्ही सहज तोंडाने सांगू शकत नाही. पण या दोन्ही संख्या एकाखाली एक लिहिल्या बेरजेचे चिन्ह दिले, तुमच्याकडे एक पेन दिला, तर तुम्ही चुटकीसरशी बेरीज करू शकता. काय कारण? कारण हेच आहे की तुम्हाला बेरीज करण्याचं तत्त्वच समजलेले आहे. मग जगातल्या कोणत्याही संख...